आम्ही असा विश्वास ठेवतो की सिनेमा ही केवळ करमणूक नाही – ती शिक्षण, भावना आणि सशक्तीकरणाचं प्रभावी माध्यम आहे. फिल्ममेकींग क्षेत्रातील तीन दशकेहून अधिक व्यावसायिक अनुभवाच्या बळावर, आम्ही फिल्म मेकिंग, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, अभिनय यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करून, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देतो.
७वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास डिझाइन केलेले हे कोर्सेस त्यांना लवकर वयातच सर्जनशील माध्यमांची ओळख करून देतात. मोबाईल सिनेमॅटोग्राफी, स्क्रिप्ट रायटिंग, व्हॉइस ट्रेनिंग, आणि व्हिडिओ एडिटिंगसारख्या कौशल्यांतून ते स्वतःची कहाणी तयार करतात आणि मांडतात. आमचं उद्दिष्ट आहे – केवळ कौशल्य शिकवणं नाही, तर त्यांच्या कल्पनाशक्तीला दिशा देणं.